Home | Looking for something? Sign In | New here? Sign Up | Log out

Monday, April 19, 2010

हे करुन पहा.

Monday, April 19, 2010

हे करुन पहा.

खाली दिलेल्या सर्व गोष्टी फार सर्वसाधारण असल्या तरी त्यातील बर्‍याच गोष्टी सर्वांना माहित नसतात. तुम्हीच बघा, यातील किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत ते. यातील एखादी गोष्ट चालत नसल्यास जास्त संशोधन करु नका अथवा अधिक माहितीसाठी हवी असल्यास गुगलची मदत घ्या.

यामध्ये ज्या-ज्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्या ठळक केलेल्या आहेत.

१. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नविन पान उघडा आणि त्यात   =rand()   हे टाईप करुन कि-बोर्डवरील एंटर बटण दाबा.
   
२. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नविन पान उघडा आणि त्यात   +_+_+_+_+   हे टाईप करुन कि-बोर्डवरील एंटर बटण दाबा.
   
३. विंडोज  XP   मध्ये आपण एखादे फोल्डर बनवून त्याला आपणास हवे असलेले नाव देतो पण जरा  CON, PRN, AUX, NUL, COM1, COM2, COM3, COM4, COM5, COM6, COM7, COM8, COM9, LPT1, LPT2, LPT3, LPT4, LPT5, LPT6, LPT7, LPT8, LPT9  ह्या नावाचा फोल्डर बनवून तर दाखवा.
   
४. Notepad  प्रोग्राम सुरु करा. आता त्यामध्ये इतर काहिही टाईप न करता फक्त
it's our our india   एवढेच टाईप करुन फाईल सेव्ह करा आणि २ मिनिटांनी तीच फाईल पून्ह उघडून बघा.
   
५. Notepad  प्रोग्राम सुरु करा. आता त्यामध्ये इतर काहिही टाईप न करता फक्त   .LOG   एवढेच टाईप करुन फाईल सेव्ह करा आणि २ मिनिटांनी तीच फाईल पून्ह उघडून बघा.
   
६. विंडोज  XP  मध्ये  Solitaire  हा गेम सुरु करा. आता कि-बोर्डवरील शीफ्ट आणि अल्टरचे  ( Shift + Alt )   बटण दाबून वरील  २ चे बटण दाबा.  तो गेम आपोआप पूर्ण होईल.
   
७. विंडोज  XP  मध्ये  FreeCell  हा गेम सुरु करा. आता कि-बोर्डवरील कंट्रोल आणि शीफ्ट ( Ctrl + Shift )   बटण दाबून वरील  F10 चे बटण दाबा. आता ' Abort '  ह्या बटणावर क्लिक करा. आता कुठलाही पत्ता पकडून कुठल्याही पत्त्यावर न्या आणि ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा. तो गेम आपोआप पूर्ण होईल.
   
८. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये एखादी वेबसाईट टाईप करताना आपण सुरुवातीला www.  आणि शेवटी  .com  टाईप करतो. त्याएवजी फक्त त्या वेबसाईटचे नाव टाईप करुन कि-बोर्डवरील कंट्रोल आणि एंटर ( Ctrl + Enter )  चे बटण दाबा. त्या वेबसाईटचे नाव आपोआप पूर्ण होवून ती वेबसाईट सुरु होईल.
   
९. रात्रीच्या वेळेस संगणकावर काम करताना डोळ्याना फार त्रास होतो. दिवसा आपल्या आसपास इतर प्रकाश असल्याने त्यावेळेस संगणकावर काम करताना संगणकाच्या स्क्रिनचा एवढा त्रास होत नाही जेव्हा आपण रात्री संगणकावर काम करीत असताना होतो. अशावेळी रात्री संगणकाचा प्रकाश इतर आसपासच्या प्रकाशाच्या मानाने प्रखर असतो अशा वेळेस डोळ्याना त्रास होतो. यासाठी कि-बोर्डवरील शीफ्ट आणि अल्टरचे  ( Shift + Alt )   बटण दाबूनPrint Screen '  चे बटण दाबा आणि ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा.  परत व्यवस्थित करण्यासाठी हिच क्रिया करा. ठेवून कि-बोर्डवरीलच ' 
   
१०. फक्त तीन बटणांमध्ये विंडोज  बंद करण्यासाठी इतर कुठलीही बटणे न दाबता विंडोजचे बटण एकदा दाबूनU'  हे बटण दोन वेळ दाबा. कि-बोर्डवरीलच  '
   
 
   
११. कुठलाही प्रोग्राम/सॉफ्टवेअर बंद करण्यासाठी कि-बोर्डवरील अल्टर आणि वरील  F4  ( Alt + F4 )  बटण दाबा.
   
१२. कॉम्प्युटरची स्क्रिन फिरविण्यासाठी कि-बोर्डवरील कंट्रोल आणि अल्टर ( Ctrl + Alt )   बटण दाबून ठेवून कि-बोर्डवरीलच चार बाणांपैकी कुठल्याही बाणावर क्लिक करा.
   
१३. ' System Properties '  सुरु करण्यासाठी कि-बोर्डवरील विंडोजचे बटण दाबून  कि-बोर्डवरीलच   Pause/Break   चे बटण दाबा.
   
१४. विंडोजमध्ये कुठल्याही ठिकाणी चालू पान  Refresh  करण्यासाठी कि-बोर्डवरील  F5  हे बटण दाबा.
   
१५. अनेक सॉफ्टवेअर्स चालू असल्यास एका सॉफ्टवेअर मधून दुसर्‍या सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी अल्टर आणि टॅब ( Alt + Tab )  या बटणाचा वापर करावा.
   
१६. विंडोजमध्ये Start  ह्या बटणावर क्लिक करा. आता त्यावरील Run  ह्या बटणावर क्लिक करा. आता काहिही न करता सरळ  telnet towel.blinkenlights.nl  हे टाईप करा अथवा कॉपी करुन पेस्ट करा ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा.  बघा जूना स्टारवॉरचा चित्रपट सुरु होईल आणि नाही झाला तर दुसर्‍या कॉम्प्युटरवर प्रयत्न करा.
   
१७. आपण जर इंटरनेट एक्स्लोरर वापरत असाल तर त्याच्या ऍड्रेसबार वर खाली लाल रंगामध्ये दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करुन एंटर मारा. तुम्हाला इंटरनेट एक्स्लोररचे ते पान थरथरताना दिसेल.

javascript:function Shw(n) {if (self.moveBy) {for (i = 35; i > 0; i--) {for (j = n; j > 0; j--) {self.moveBy(1,i);self.moveBy(i,0);self.moveBy(0,-i);self.moveBy(-i,0); } } }} Shw(6)



0 comments:

Post a Comment